Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Fursungi Fake Doctor : फुरसुंगीत तोतया डॉक्टर गजाआड

फुरसुंगीत तोतया डॉक्टर गजाआड - वैद्यकीय व्यवसाय अधिनियमातंर्गत गुन्हा

वैद्यकीय व्यवसाय अधिनियमातंर्गत गुन्हा

marathinews24.com

पुणे – Fursungi Fake Doctor : वैद्यकीय पदवी नसताना निसर्गोपचार केंद्राच्या नावाने रुग्णांवर उपचार करणार्‍या तोतया डॉक्टरला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली. शहजाद इक्बाल मोहम्मद खान उर्फ राज पटेल (वय ३४, रा. खटीक मोहल्ला, सांगोद, जि. कोटा, राजस्थान) याला अटक करण्यात आली. प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश पाखरे (वय ४९) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दारूच्या नशेत झाला वाद, ‘डिलिव्हरी बॉयवर कोयत्याने वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहजाद खानने हडपसर-सासवड रस्त्यावरील इमारतीत राज पटेल नॅचरोपॅथी केअर नावाने रुग्णालय सुरू केले होते. आरोपी खान याच्याकडे वैद्यकीय पदवी नव्हती. वैद्यकीय पदवी नसताना तो उपचार करत असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य विभागाला मिळाली. Fursungi Fake Doctor त्यानंतर याची माहिती फुरसुंगी पोलिसांना कळविण्यात आली. फुरसुंगीत एस. पी. रेसीडन्सी इमारतीतील खानच्या दवाखान्यावर कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी खानला अटक केली. त्याच्याविरुद्ध फसवणूक, तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३, ३३ (अ)अन्वये गुहा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शंभूराज जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×