Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Ganesh Peth Assault Case : मिरवणुकीनंतर झालेल्या वादातून तरुणाला मारहाण

Pune Crime News

गणेश पेठेतील घटना; एकाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – मिरवणुकीनंतर झालेल्या किरकोळ वादातून तरुणाला भात वाढणीने मारहाण करण्यात आली. Ganesh Peth Assault Case भात वाढणी डोक्यात घातल्याने गंभीर जखमी झाला. गणेश पेठेतील बुरुड आळीत ही घटना घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला.

पुण्यात बिग बॉस’ फेम रीलस्टार दिव्या शिंदेचा साथीदारांसह राडा – सविस्तर बातमी 

विनायक घोरपडे असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अक्षय हादगे (वय २५, रा. बुरुड आळी, गणेश पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अविनाश दत्तात्रय येनपुरे (वय ४५, रा. भाग्यश्री अपार्टमेंट जीवनधारानगर, धनकवडी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Ganesh Peth Assault Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीनिमित्त घोरपडे हे त्यांचे मित्र विनायक घोरपडे यांच्याकडे आले होते. बुरूड आळीतील एका मंडळाच्या एका मिरवणुकीत ते सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर कार्यकर्त्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मध्यरात्री एकच्या सुमारास जेवण सुरू असताना घोरपडे यांनी महिलांना पहिले जेवण द्या, असे सांगितले. या कारणावरुन आरोपीने घोरपडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. Ganesh Peth Assault Case आरोपीने घोरपडे यांच्या डोक्यात लोखंडी भात वाढणी घातली. घोरपडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घोरपडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार संदीप धनवटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×