Breking News
ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालन

पालखी सोहळ्यात चोरी करणाऱ्या टोळ्या जेरबंद

पालखी सोहळ्यात चोरी करणाऱ्या टोळ्या जेरबंद

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई; २३ तोळे सोन्यासह १४ मोबाईल असा २४ लाखाचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये भाविकांसह नागरिकांचे मोबाईल, महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळ्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. करवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून २२.५ तोळे सोन्याचे दागिने आणि विविध कंपन्यांचे १४ मोबाईल असा २३ लाख ९१ हजार १३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पालखी सोहळ्यात ज्याचे दागिने व मोबाईल चोरीस गेले आहेत, त्यांनी हडपसर व वानवडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शन – सविस्तर बातमी 

चांदणी शक्ती कांबळे (वय. ३२) रिटा ऊर्फ गंगा नामदेव कांबळे (वय. ३५ ) बबीता सुरज उपाध्ये ( वय. ५७ ) पुजा धिरज कांबळे ( वय. ३५ सर्वजण राहणार उदगीर, जि. लातूर) गणेश विलास जाधव (वय ३०, सध्या रा. मु. पो. व्यागळी, ता. अक्कलकोट, जि.सोलापुर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी वारीच्या दरम्यान चोरलेले सोन्याचे २० गिनी गंठण, मंगळसुत्रे असे १९ लाख ४१ हजार ३१० रुपये किंमतीचे २२.५ तोळे सोने जप्त केले. त्यांनी हडपसर आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्हाचीही कबुली दिली आहे.

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची व नागरिकांची मोठी गर्दी होते. गर्दीचा फायदा घेवून नागरिकांचे विशेषत: महिलांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रीय होतात. त्याअनुषंगाने टोळ्यांना पायबंद घालण्यासाठी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी गुन्हे शाखा युनिट ५ व ६ च्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नेमणुक केली होती. पोलिस निरीक्षक वाहीद पठाण यांच्यासह गुन्हे प्रतिबंधक पथ पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती.

पालखी सोहळ्यात चोरी करणाऱ्या टोळ्या जेरबंद

पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेवून वारकऱ्यांचे व नागरिकांचे विविध कंपन्याचे मोबाई चोरल्याप्रकरणी अरबाज नौशाद शेख, वय, १९ वर्षे, रा. महाराजपुर, थाना तलझारी जि. साहेबगंज, झारखंड याच्यासह त्याच्या एका अल्पवयीन साथिदाराला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे १४ मोबाईल जप्त केले आहेत. त्यांनी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक अशा तिन गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी २२.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेस, १४ मोबाईल असा एकुण २३ लाख ९१ हजार १३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान ज्या नागरीकांचे मोबाईल व ज्या महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेलेले आहेत, त्यांनी हडपसर व वानवडी पोलिस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख.

पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे – २) जेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ५ व ६, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार राजस शेख, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, बाळासाहेब सकटे, अकबर शेख, शेखर काटे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे, निलेश साळवे, सुहास डोंगरे, वैशाली इंगळे, ज्योती मुल्का, वैशाली खेडेकर, सारंग दळे, निर्णय लांडे, जावेद शेख यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×