Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक, कोयता जप्त

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक, कोयता जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कोयता, मिरचीपूड, इतर दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई २१ सप्टेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास कात्रज-कोंढवा पुलाजवळ घडली आहे.

मद्य प्राशन करुन वाहन चालविणे अंगलट – सविस्तर बातमी 

शुभम सतीश गोसावी (वय २२, रा. कात्रज, नवीन वसाहत) वैभव गजानन वनारे (वय २१ रा. उरळी गाव, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. टोळीचे दोन साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी पोलीस अमलदार वसंत साबळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, कात्रज-कोंढवा पुलाजवळील एका खोलीत काहीजण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले. त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेउन पळून गेले. टोळीकडून कोयता, मिरचीपूड असे साहित्य जप्त केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×