Breking News
धक्कादायक…प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचारपुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आगगर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावीवडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटकऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीराजा पंढरीचा’ भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमाऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कारबंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसारपोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्नव्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते देवीची आरती

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते देवीची आरती

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणेकरांना नवरात्रीच्या दिल्या हार्दिक शुभेच्छा

marathinews24.com

पुणे – वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. नाम-ज्ञान-प्रेम-दानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात भक्तीसंगीत, पारायण, हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन श्री दगड जीवदया संस्था जवळ, आगम जैन मंदिर समोर, कात्रज, पुणे येथे करण्यात आले आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मातेचे दर्शन घेऊन पुणेकरांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री सुसवाणीमाता सच्चीयायमाता चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजक प्रमोद दुगड, मोनल दुगड उपस्थित होते.

संवेदनक्षम मनाची क्षमता न ओळखणे ही आधुनिक अस्पृश्यता : डॉ. मोहन आगाशे – सविस्तर बातमी 

पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणेकरांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, आज दुगड परिवाराच्या निमंत्रणांवरून माता सच्चीयाय देवीची आरती करण्याचा योग आला, मंदिरात येऊन अतिशय प्रसन्न वाटले. दुगड परिवार राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचेही पोलिस आयुक्तांनी यावेळी कौतुक केले.

मोनल दुगड म्हणाल्या, माणिकशेठ दुगड यांनी 35 वर्षांपूर्वी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या मंदिराची उभारणी केली. येथे नवरात्री मध्ये विविध धार्मिक कार्य करत आहोत, यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, स्त्री सूक्त पठण , याशिवाय येथे गोशाला आहे, चारशे हून अधिक गायांचा सांभाळ आम्ही करत असून इतरांच्या आजारी गायींना इथे आणले तरी आम्ही त्यांच्यावर योग्य ते उपचार करतो त्यांची काळजी घेतो, अन्नछत्र 24 तास सुरू असते, आज दुगड यांची चौथी पिढी देवीच्या सेवेत आहे.

प्रमोद दुगड म्हणाले, आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक उपक्रम आम्ही घेत असतो. यंदाही धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहोत. अष्टमीच्या दिवशी महाकुंभ महोत्सव होत आहे, यामध्ये 108 जोडपी हवन करणार आहेत. सर्व उपक्रम गौरव दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे प्रमोद दुगड यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×