पुण्यात दिवसाढवळ्या सोनसाखळी हिसकावल्या

पुण्यात दिवसाढवळ्या सोनसाखळी हिसकावल्या

महिला सुरक्षिततेचा उठला बाजार, कुठे आहे कायद्याचे शासन

marathinews24.com

पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झालेले असतानाही पोलीस ढिम्म आहेत. विशेषतः वारंवार पुणेकरांसह महिला सुरक्षिततेचा पाढा वाचणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे पोलीस दलावरील नियंत्रण राहिले की नाही, असा प्रश्न विविध गंभीर घटनांमुळे निर्माण झाला आहे. कोयता गँग, वाहन तोडफोड, विषारी दारूचे बळी, महिला छेडछाड विनयभंगाच्या घटनेनंतर एकाच दिवसांत दुचाकीस्वार चोरट्यांनी तब्बल ५ ठिकाणी महिलांचे दागिने हिसकावून नेले आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी जबाबदारी घेउन, उत्तर देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या – सविस्तर बातमी 

रस्त्याने पायी चाललेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याच्या पाच घटना घडल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. ३१ मे रोजी पर्वता स्वारगेट, वानवडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ ठिकाणी दुचाकीस्वार चोरट्यांनी साडे लाखांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले आहेत.विशेषतः दिवसाढवळ्या घडलेल्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात असून, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी जबाबदारी घेण्याची मागणी केली जात आहे.

रस्त्याने पायी चाललेल्या ५० वर्षीय महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना ३१ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जलशुद्धीकरण केंद्रासमोरील रस्त्यावरील घडली आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर दुचाकीस्वार चोरट्यांनी पहिल्या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादावाडी जैन मंदीराच्या प्रवेशद्वाराजवळ ५७ वर्षीय महिलेच्या गळ्यातील १ लाख ८० हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली. ही घटना ३१ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली असून, गुलटेकडी परिसरात राहणार्‍या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार चोरट्यांनी जेष्ठ महिलेजवळ गाडी थांबवून त्यांच्या गळ्यातील १ लाख ५६ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली आहे. ही घटना ३१ मे रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेटमधील मित्रमंडळ चौकात घडली आहे. याप्रकरणी महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, मॉर्निंग वॉक करणार्‍या ५४ वर्षीय नागरिकाला अडवून अज्ञात चोरट्यांनी १ लाखांचे सोन्याची चैन हिसकावून नेली आहे. याप्रकरणी हडपसर परिसरात राहणार्‍या ५४ वर्षीय नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक मोकाटे तपास करीत आहेत. पाचव्या घटनेत चोरट्यांनी रवी पार्क सोसायटी परिसरातून पायी चाललेल्या जेष्ठ महिलेला अडवून त्यांच्या गळ्यातील ३ लाखांची सोन्याची चैन हिसकावून नेली आहे.

गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांना कानपिचक्यांची गरज

स्थानिक पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेतील अधिकारी-कर्मचार्‍यांचा कामचुकरपणा वाढला आहे. त्यामुळेच गुन्हेगारी वाढली असून, दिवसाढवळ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून दुचाकीस्वार चोरटे सुसाट सुटले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती असून, गुन्हेगारांविरूद्ध कारवाईच्या नावाने शिमगा घालणार्‍या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना कानपिचक्या देण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×