Breking News
Marathi Subtitles : समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती -प्रधान सचिव ब्रिजेश सिंहPune Crime : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटनाKharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवली

पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी अल्प मुदतीच्या प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास व रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील नवीन बॅचेस १ एप्रिल २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या माध्यमातून १५ ते ४५ वयोगटातील पात्र उमेदवारांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. ८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू करण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यात अधिक उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमधील उपलब्ध सुविधा तसेच अत्याधुनिक प्रशिक्षण साधनांचा वापर करून तज्ञ मार्गदर्शकांकडून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा कार्यक्रम मागणी आधारित (डिमांड ड्रिव्हन) असून उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक प्रगत कौशल्ये उमेदवारांना प्रदान करण्यात येणार आहेत.

या प्रशिक्षणासाठी शिक्षण घेत असलेले, शिक्षण पूर्ण केलेले तसेच शिक्षण अर्धवट सोडलेले १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवती पात्र आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, यामुळे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन सु.रा. वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालयांशी संपर्क साधावा किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच (०२०) २६१३३६०३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×