Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावाबोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेधदहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादापुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रियापुणे-पिंपरीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडेदहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदलपुण्यात पानटपरी चालकाकडून ३०० रुपये हप्ता; खराडीतील पोलिस निलंबित

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट

दिव्यांग जवानांच्या पुनर्वसन कार्याची घेतली माहिती; माउथ पेंटिंग करणाऱ्या जवानांच्या कलेचे केले कौतुक

marathinews24.com

पुणे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी खडकी येथील ‘पॅराप्लेजिक’ पुनर्वसन केंद्राला भेट देऊन दिव्यांग जवानांच्या पुनर्वसनाच्या कामाची माहिती घेतली. यावेळी दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल विशाल अग्रवाल, संस्थेचे संचालक कर्नल रतन कुमार मुखर्जी आदी उपस्थित होते.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्‍या दीक्षांत समारंभाला उपस्थिती – सविस्तर बातमी 

युद्ध, सैन्य मोहिमेदरम्यानच्या कार्यावर असताना दिव्यांग झालेल्या जवानांच्या शारीरिक, मानसिक पुनर्वसनाचे काम या संस्थेत होत असल्याची माहिती मेजर जनरल अग्रवाल आणि कर्नल मुखर्जी यांनी यावेळी दिली.

यावेळी राज्यपाल यांनी संस्थेतील पुनर्वसन झालेल्या आणि आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तर आदींमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या दिव्यांग खेळाडूंशी संवाद साधला. त्यांनी संस्थेतील दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या छायाचित्र दालनाला भेट दिली.

दिव्यांग जवानांनी बनवलेल्या वस्तू पाहिल्या. माउथ पेंटिंग करणारे चित्रकार जवान यांच्याशी त्यांनी विशेष संवाद साधला आणि त्यांच्या कलेला दाद दिली.

संस्थेतील पुनर्वसनाच्या विविध भागांसाठी सामाजिक उत्तरदायित्त्व निधीतून आर्थिक सहाय्य मिळते असे यावेळी राज्यपालांना सांगण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×