Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

पुण्यात तो चोरायचा फक्त मोपेड दुचाकी, सराईताला अटक

पुण्यात तो चोरायचा फक्त मोपेड दुचाकी, सराईताला अटक

४ दुचाकी जप्त, कोथरूड पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूड परिसरातून फक्त मोपेड दुचाकींची चोरी करणार्‍या सराईताला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणून चार दुचाकी जप्त केल्या आहेत. पियुष राम सांवत (वय १८ रा.जयभवानी नगर, कोथरुड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दरम्यान, संबंधित चोरी केलेल्या दुचाकींचे लॉक उघडण्यास आरोपी निष्णात असल्याचेही तपासात उघडकीस आले आहे.

खराडी, हडपसरमध्ये फ्लॅटमधून लॅपटॉप चोरीला – सविस्तर बातमी 

मध्यरात्रीच्या सुमारास कोथरूडमधील शिवतीर्थ नगरातून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार ३ जूनला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक अनिल माने, पोलीस निरीक्षक सुनिल कारोटे यांनी तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार दत्ता सोनावणे, श्रीकांत दगडे हे सीसीटीव्ही फुटेज तपासणे, रेकॉर्डवरील आरोपी तपासणे, तांत्रिक तपास करीत होते. तांत्रिक तपासानुसार वाहन चोरी करणारा संशयित गुजरात कॉलनी भागात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

पोलीस पथकाने गुजरात कॉलनीमध्ये सापळा रचुन पीयुष सावंत याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हयातील वाहन चोरी केल्याची कबुली दिली. त्याने ज्या ठिकाणी दुचाकी लावली होती तेथुन जप्त केली आहेत. ही कामगिरी एसीपी सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मोहन चव्हाण, अंमलदार दत्ता सोनवणे, श्रीकांत दगडे, पोलीस अंमलदार मयुर पांढरे, ऋषिकेश कोळप, जय खरात,मंगेश शेळके, आकाश वाल्मिकी, विष्णु राठोड, वैभव शितकाल, शकील पठाण यांनी केली.

कोथरूड परिसरातून दुचाकींची चोरी करणार्‍या सराईताला अटक केली असून, त्याच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल केली असून, आणखी जप्त केलेल्या एका दुचाकी मालकाचा शोध घेतला जात आहे. अरूण घोडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरूड पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×