Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Hadapsar Crime : रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; एकाला मारहाण

Crime News : दगडूशेठच्या दर्शनासाठी चाललेल्या दाम्पत्याला लुटले

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याने जाब विचारणाऱ्या एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी महिलेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत रमीत राकेश गुप्ता (वय ३५, सध्या रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, मूळ रा. जिंदल ग्लोबल सिटी, सोनीपत, हरयाणा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महिलेसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करुन दहशत माजविण्याचा प्रकार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांचे नातेवाईक हडपसर भागातील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. ३ ऑक्टोबर रोजी फिर्यादी आणि त्यांचे मित्र सकाळी सातच्या सुमारास रुग्णालयातील बिलिंग विभागात पैसे भरण्यासाठी थांबले होते. त्या वेळी एक बुरखा परिधान केलेली महिला आणि तिचे नातेवाईक बिलिंग विभागात आले होते. रुग्णालयातील बिलावरुन ते बिलिंग विभागातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत होते. आरोपी रुग्णालयाच्या आवारात शिवीगाळ करत होते. बिलिंग विभागात रांगेत थांबलेले गुप्ता यांनी आरोपींना शिवीगाळ करु नका, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करु नका, असे सांगितले.

या कारणावरुन आरोपी चिडले. आरोपींनी गुप्ता यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. मारहाणीच्या प्रकारानंतर गुप्ता यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. बेकायदा जमाव जमविणे, तसेच मारहाण केल्या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेसह, तिचे नातेवाईक इब्राहिम शेख, मुन्ना शेख, गुड्डू शेख, खलिजा शेख यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक फाटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×