Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

पुण्यात हॉकर्स, पानटपर्‍या रात्री १० वाजता बंद म्हणजे बंदच

इतर आस्थापना विहीत वेळेप्रमाणे बंद करणार-पोलीस आयुक्त

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात नाईट लाईफच्या नावाखाली सुरू असलेल्या विना परवाना हॉकर्स व्यावसायिक, पानटपर्‍या रात्री १० वाजताच बंद करण्यात येणार आहे. मात्र, इतर आस्थापना विहीत वेळेनुसार बंद केल्या जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बेशिस्तांविरूद्ध कारवाईसाठी शहरभर मोहिम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

हांडेवाडीत अवैध हातभट्टी दारूविक्री रडारवर – सविस्तर बातमी

अमितेश कुमार म्हणाले, कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांत विविध ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्यावेळी रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे दिसून आले. प्रामुख्याने विविध नियमांचे उल्लंघन करीत विना परवाना हॉकर्स (पदपाथ, टपर्‍यावरील खाद्यपदार्थ विक्रेते) रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पान टपर्‍यांवर गर्दी सर्वाधिक आहे. त्यापार्श्वभूमीवर नियमाप्रमाणे संबंधित हॉकर्स, पानटपर्‍या रात्री १० वाजता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व हॉकर्स, पानटपर्‍या बंद केल्या जात आहेत. दरम्यान, इतर आस्थापना विहीत वेळेप्रमाणे बंद करण्यात येणार आहेत.

म्हणून उगारला कायद्याचा बडगा

विविध कारणातून खुन, खूनाचा प्रयत्न, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा आलेख वाढला आहेत. बहुतांश पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशा घटना घडल्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सलग तीन दिवस रात्री स्वतः मैदानात उतरून पेट्रोलिंग केले. त्यांच्या पाहणीत नाईट लाईफच्या नावाखाली हॉकर्ससह पानटपरी व्यावसायिक, इतर धंदेवाल्यांकडून हैदोस घातला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे परिसरातील शांतता नष्ट होणे, रहिवाशांना मनस्ताप होणे, तरूणाईचा धांगडधिंगा वाढला होता. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वतःच्या हद्दीतील बेशिस्तांना वठणीवर आणण्यासाठी नियमांचा बडगा उगारला आहे.

नाईट लाईफचा धांगडधिंगा येणार वठणीवर

डेक्कन चौपाटी, नळस्टॉप, कर्वेनगर, कोथरूड, स्वारगेट चौपाटी, विमाननगर, कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, हडपसर, बाणेर, कोंढवा, कॅम्प, कात्रजसह अनेक ठिकाणी नाईट लाईफचा धांगडधिंगा विहीत वेळेपेक्षा मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करीत आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. दरम्यान, इतर आस्थापना, हॉटेल व्यावसायिकांना त्यांच्या विहीत वेळेचा दिलासा देण्यात आला आहे.

पुण्यात जमावबंदी नाही, प्रतिबंधात्मक आदेश-पोलीस आयुक्त

शहरात कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर २६ मे ते ८ जून कालावधीत पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. कुठल्याही प्रकारची जमावबंदी केली नाही, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. संबंधित १४ दिवसांच्या कालावधीत स्फोटक पदार्थ, ज्वलनशील पदार्थ ने-आण करण्यावर बंदी आहे. तसेच गुन्हेगारांची रील सोशल मीडियावर प्रसारित करून दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणार्‍याविरूद्ध कारवाई केली जाणार आहे. तसेच विविध मागण्यांसाठी राजकीय, सामाजिक संघटना, मोर्चे, धरणे, निदर्शने , बंद, उपोषण करतात. विविध कारणांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

शहरातील विविध भागात रात्री-अपरात्री करीत हॉकर्ससह पानटपरी व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. त्यापार्श्वभूमीवर नियमाप्रमाणे रात्री १० वाजता संबंधित हॉकर्स, पानटपर्‍या बंद केल्या जात आहेत. इतर आस्थापना विहीत वेळेप्रमाणे बंद करण्यात येतील.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×