Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

कल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक

कल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

marathinews24.com

मुंबई – कल्याण रेल्वे यार्ड परिसरात दि. १६ मे रोजी घडलेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा, महिला व बालकांचे संरक्षण तसेच परिसरातील रेल्वेच्या पडीक इमारतींच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशनादरम्यान उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याची माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. त्यांनी विधानभवनात उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन कल्याण रेल्वे यार्ड परिसरातील सुरक्षाविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी रेल्वे प्रशासन, पोलीस, महापालिका आणि अन्य विभागांमध्ये समन्वय वाढवून तातडीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे-आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील – सविस्तर बातमी 

डॉ. गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखालील यापूर्वी १८ मे रोजी शिष्टमंडळाने डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर हरीश मीना यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या होत्या. रेल्वे यार्ड आणि प्लॅटफॉर्म परिसरात पुरेशी प्रकाशयोजना, मोबाईल नेटवर्क सुविधा, सीसीटीव्ही यंत्रणा आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर रेल्वे पोलिसांची उपस्थिती वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. महिलांना आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी व कुठे मिळू शकते, याबाबत रेल्वे स्थानकांवर सातत्याने सूचना आणि उद्घोषणा करण्याची आवश्यकता असल्याचेही शिष्टमंडळाने नमूद केले. काही वेळा सिग्नलला थांबलेल्या रेल्वेगाड्यांमधील महिला डब्यांत समाजकंटक घुसून महिलांना त्रास देत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून, त्यावर नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

रेल्वे प्लॅटफॉर्मवरील बेघर मुलांसाठी निवारा व शिक्षणाची व्यवस्था आणि रेल्वेमार्गे होणारी मुलींची अनैतिक वाहतूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, या मागण्यांची अंमलबजावणी अद्याप पूर्णपणे झालेली नसल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. सर्व बाबींची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी येत्या २२ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनादरम्यान डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, पोलीस आयुक्त, लोहमार्ग पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. रेल्वे परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी या बैठकीत ठोस निर्णय होईल असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×