Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

वेल्ह्यात हाॅटेल चालकासह कामगारावर गोळीबार

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी

गोळीबार प्रकरणात दोघे अटकेत

marathinews24.com

पुणे – वादातून हाॅटेल चालकासह कामगारावर पिस्तुलातून गाेळीबार करण्यात आल्याची घटना वेल्हे तालुक्यातील कोदवडी फाटा परिसरात रविवारी रात्री घडली. हल्लेखोरांनी दोघांवर कोयत्याने वार केले. या घटनेत हाॅटेल मालकासह कामगार जखमी झाला. पसार झालेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी हल्लेखाेरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत हाॅटेल मालक म्हस्कू तानाजी दसवडकर, कामगार दशरथ शिळीमकर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी ओंकार सुरेश इंगुळकर (वय १९), विशाल अप्पा इंगुळकर (वय २४, दोघे रा. सुरवड, ता. वेल्हे, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिक महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी

‘आरोपी इंगुळकर आणि साथीदारांचा चार ते पाच दिवसांपूर्वी कोदवडी फाटा परिसरातील हाॅटेल श्रीनाथचे मालक म्हस्कू दसवडकर यांच्याशी वाद झाला होता. रविवारी (२४ मे) रात्री दहाच्या सुमारास इंगुळकर आणि साथीदार हाॅटेलमध्ये शिरले. त्यांनी हाॅटेल मालक दसवडकर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी दसवडकर यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. इंगुळकर यांच्यावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार केला. त्या वेळी हाॅटेलमधील कामगार यांनी शिळीमकर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी दसवडकर आणि शिळीमकर यांच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोघ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींबरोबर असलेल्या साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे’, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×