Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

आंबेगावात घरफोडी, रोकडसह दागिने चोरीला

हडपसरमधील उच्चभ्रु सोसायटीत भरदिवसा घरफोडी

आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – राहत्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने असा मिळून २२ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १९ मे रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास आंबेगाव बुद्रूकमधील बळवंत हाईट्समध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुख्यात आंदेकर टोळीने तरूणावर गोळ्या झाडून कोयत्याने केले वार,चौघांना बेड्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आंबेगावातील बळवंत हाईट्समध्ये राहायला असून, १९ मे रोजी सकाळच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील साडेआठ हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा २२ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करीत आहेत.

किराणा माल विक्रीच्या दुकानातील ४१ हजार चोरले

किराणा माल विक्रीच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४१ हजार ३५० रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना १७ ते १८ मे कालावधीत वानवडीतील महालक्ष्मी डिपार्टमेंट शॉपमध्ये घडली आहे. याप्रकरणी जेष्ठ नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार गोसावी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×