५ लाखांचा गुटखा जप्त, खडक पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – अवैधरित्या गुटख्याचा साठा करून विक्रीच्या तयारीतील आरोपीचा डाव खडक पोलिसांनी उधळला आहे. याप्रकरणी त्याला अटक करून ४ लाख ८७ हजारांचा गुटखा पानमसाला जप्त करण्यात आला आहे. रियाज नुर खान (वय ४० रा. ५४ ए.पी.लोहीयानगर, गल्ली क्रमांक एक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यात भरदिवसा ज्वेलर्सवर दरोडा, ५ तोळ्यांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
बेकायदेशिर गुटखा विक्री करणार्यांविरूद्ध कारवाईचे आदेश खडक ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण आणि पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांनी तपास पथकाला दिले होते. त्यानुसार एपीआय अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे हे पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार हर्षल दुडम यांना लोहियानगरमधील पठाण पान शॉपमध्ये अवैद्य गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी छापा टाकून ५ लाखांचा गुटखा जप्त केला.
आरोपी रियाज नुर खान याने गुटखा कोठून आणला, कोणाकडून आणला, कोणत्या वाहनातून आणला, कोणाला विक्री केला, कोणाकडे अवैध गुटखा विक्री सुरू आहे, याचा तपास केला जात आहे. ही कामगिरी उपायुक्त संभाजी कदम,एसीपी अनुजा देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अनिल फरांदे, अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, शुभम केदारी, विश्वजित गोरे, योगेश चंदेल, निलेश दिवटे, शोएब शेख, मयूर काळे यांच्या पथकाने केली आहे.