कुटुंबासमोर झाडल्या गोळ्या
marathinews24.com
जम्मू – काश्मीरच्या पहलगममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हल्ल्यात हैदराबादमध्ये कार्यरत इंटेलिजेंस ब्युरो अधिकारी यांच्यावर कुटुंबासमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. मनीष रंजन असे ठार झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. बिहारचा मूळ रहिवासी मनीष रंजन हे कुटुंबासमवेत रजा प्रवासात (एलटीसी) भेट देत होता. इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) मधील सूत्रांच्या प्राथमिक माहितीनुसार, पत्नी आणि मुलांसमोर त्याचा मृत्यू झाला. मनीष रंजनने गेल्या दोन वर्षांपासून इंटेलिजेंस ब्युरोच्या हैदराबाद कार्यालयाच्या मंत्री विभागात काम केले.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठार झालेल्यामध्ये पुण्यातील काही जणांचा समावेश आहे. हल्ल्यात अनेजकण जखमी झाले आहेत.
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात मी निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. असेही त्यांनी सांगितले.