Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

राज्य महिला आयोगाच्या निर्देशाने संरक्षण अधिकाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाही

राज्य महिला आयोगाच्या निर्देशाने संरक्षण अधिकाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाही

पीडित महिला व मुलीला बेघर होण्यापासून दिलासा

marathinews24.com

पुणे – राज्य महिला आयोगाने शिफारस केलेल्या एका महत्वपूर्ण प्रकरणात वडगाव मावळ येथील संरक्षण अधिकारी प्रवीण नेहरकर यांनी तत्काळ कार्यवाही केल्यामुळे एका निराधार विधवा महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला बेघर होण्यापासून दिलासा मिळाला.

पुण्यात पालखी सोहळ्यावेळी ५ लाख वारकरी मुक्कामी – सविस्तर बातमी 

राज्य महिला आयोगाने वडगाव मावळच्या संरक्षण अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी (दि. १३) अतिशय संवेदनशील प्रकरण सोपविले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी पुणे यांच्या कार्यालयातून या प्रकरणाच्या अनुषंगाने कागदपत्रे मिळाली. या प्रकरणातील पीडित महिलेच्या पतीचे सन २०२३ मध्ये निधन झाल्यामुळे ती आणि तिची अल्पवयीन मुलगी पूर्णपणे निराधार झाली. मावळ-मुळशी येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या एका आदेशामुळे पीडित महिला व मुलीला त्यांच्या राहत्या घरातून बाहेर जावे लागणार होते.

कागदपत्रे मिळताच नेहरकर यांनी पीडित महिलेचा कौटुंबिक घटनेचा अहवाल (डीआयआर) तयार करुन मंगळवार १७ जून रोजी वडगाव मावळ न्यायालयात दाखल केला. वकिलाची अनुपस्थिती असतानाही नेहरकर यांनी स्वतः महिलेची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडल्यामुळे आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन न्यायालयाने त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निवासाचा अंतरिम आदेश पारित केला.

यामुळे महिलेला तात्काळ मोठा दिलासा मिळाला. या यशानंतर संरक्षण अधिकाऱ्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून या महिलेला वकीलही मिळवून दिला, जेणेकरून तिच्या कायदेशीर लढ्याला बळकटी मिळेल. न्यायालयाने केवळ अंतरिम आदेशच दिला नाही, तर तत्काळ सुनावणीची पुढील तारीखही निश्चित केली, जेणेकरुन पीडितेला न्याय मिळण्यास कोणताही विलंब होणार नाही, असे नेहरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×