Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

महिलेवर अत्याचार प्रकरणात भोंदू ऋषीकेश वैद्यला पिंपरीतून अटक

महिलेवर अत्याचार प्रकरणात भोंदू ऋषीकेश वैद्यला पिंपरीतून अटक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरीतून केली अटक

marathinews24.com

पुणे – दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करून महिलेवर अत्याचार करुन पसार झालेला भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरीतून अटक केली. याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये महिलेची भोंदू ऋषीकेश वैद्य याच्याशी समाज माध्यमातून ओळख झाली. आरोपी मूळचा वसईचा आहे. पीडित महिला व्रतवैकल्ये करायची. भोंदूने तिला जाळ्यात ओढले. ‘माझ्यात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवितो,’ अशी बतावणी त्याने महिलेकडे केली.

उपाहारगृहातील गॅस गळतीमुळे चार कामगार होरपळले – सविस्तर बातमी 

त्याने महिलेला जाळ्यात ओढले. आरोपी २०२३ मध्ये पुण्यात आला. त्याने पीडित महिलेची मांजरी परिसरात भेट घेतली. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिला पुन्हा वसईत बोलावले. वसईतही तिच्यावर बलात्कार केला.

नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने महिलांना जाळ्यात ओढून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील पीडित महिलेने पाेलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती तिने पोलिसांनी दिली. सुरुवातीला तिने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वसई पोलिसांनी संंबंधित गुन्हा तपासासाठी पुण्यातील हडपसर भागात मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केला.

वैद्य याचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथकांकडून शोध घेण्यात येत होता. वैद्य हा पिंपरी परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली. ‘वैद्य याने आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता आहे. दैवी शक्तीचा संचार झाल्याची बतावणी करून त्याने महिलेवर अत्याचार केेले. अशा प्रकारची कुणाची तक्रार असल्यास पीडित महिलांनी पुणे पोलिसांकडे तक्रार द्यावी,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×