Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

वारकरी संप्रदयाचा अपमान, विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात

वाघोली पोलिसांनी घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – वारकरी संप्रदयासह संत महंताबाबत सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्त विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी महिला किर्तनकाराने ८ मे रोजी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा पोलिसांना जाब विचारला.

कुख्यात आंदेकर टोळीने तरूणावर गोळ्या झाडून कोयत्याने केले वार,चौघांना बेड्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला किर्तनकार असून, त्यांच्या फिर्यादीनुसार विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर वारकरी संप्रदायबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हिंदु देव-देवतांचा अपमान, धर्म-वंश गटामध्ये वादविवाद लागणारे हे वक्तव्य असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. तसेच लवांडे यांनी सनातन धर्म, हिंदुसंत, महंत, वैदिक परंपरा आणि समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार वाघोली पोलिसांनी लवांडे यांना ताब्यात घेतले.

पुरावा नसताना पोलीस मला अटक करण्यासाठी रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे.

विकास लवांडे, प्रवक्ते

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×