गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक
marathinews24.com
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीत केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २३ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सायबर चोरट्यांनी बतावणीने जेष्ठाला फसवल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारक सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाऊ घेऊन येत असताना कार चालकाने मुलाला चिरडले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कोथरूड भागात राहायला असून, जानेवारी २०२५ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. त्यानुसार तक्रारदार जेष्ठाने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. सायबर चोरट्यांनी सुरुवातीला परताव्याच्या स्वरुपात काही रक्कम जेष्ठाच्या बँक खात्यात वर्ग करीत त्यांचा विश्वास संपादित केला.
परतावा मिळत असल्यामुळे तक्रारदाराने वेळोवेळी तब्बल २३ लाख रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर चोरट्यांनी परतावा देण्याचे बंद केले. त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे तपास करत आहेत. दरम्यान, अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील हॅप्पी कॉलनीत राहणार्या ५६ वर्षीय नागरिकाची २ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत संबंधिताने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हडपसरमध्ये दीड लाखांची रोकड चोरी
पुणे- फ्लटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना हडपसर भागातील सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी धीरज निवृत्ती जाधवर (वय २९, रा. स्मार्ट हाईट्स, फुरसुंगी, हडपसर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधवर यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप चोरट्यांनी तोडले. त्यानंतर कपाट उचकटून दीड लाखांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खंदारे तपास करत आहेत.