Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

घरकाम करणाऱ्या महिलेकडून दागिने लंपास

घरकाम करणाऱ्या महिलेकडून दागिने लंपास

महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ महिलेच्या घरात काम करणाऱ्या महिलेने कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा १ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे उघडकीस आले. पसार झालेल्या महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; तिघे आरोपी गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७४ वर्षीय ज्येष्ठ महिला हडपसरमधील मगरपट्टा भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांच्या सदनिकेत एक महिला घरकामास होती. ज्येष्ठ महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून महिलेने कपाटातील ३६ हजार ९०० रुपये आणि सोन्याचे दागिने असा एक लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ऐवज चोरुन महिला पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील तपास करत आहेत.

मंदिरातून चांदीचे मुखवटे चोरीला

पर्वती दर्शन परिसरातील एका मंदिरातून चोरट्यांनी देवीचे चांदीचे दोन मुखवटे चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती दर्शन परिसरात श्री काळूबाई मंदिर आहे. १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. चोरट्यांनी ७४ हजार रुपयांचे चांदीचे दोन मुखवटे चोरुन नेल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×