Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीला

पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील बंडगार्डन रस्त्यावरील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्य महिलेचे दागिने चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका रुग्ण महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीला -सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ४० वर्षीय महिला बंडगार्डन रस्त्यावरील एका रुग्णालयात उपचार घेत होती. ३० मे रोजी दुपारी एकच्या सुमारास चोरटा रुग्णालयातील कक्षात आला. त्याने महिलेला प्रसाधनगृहात जाऊन या, असे सांगितले. चोरटा रुग्णालयातील कर्मचारी वाटल्याचे महिलेला वाटले. त्यानंतर महिला प्रसाधनगृहात गेली.

चोरट्याने रुग्ण महिलेच्या पिश‌वीत ठेवलेले १६ हजार ५०० रुपयांची सोन्याची कर्णफुले चोरून नेली. महिला प्रसाधनगृहातून आल्यानंतर काही वेळाने पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीतील दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांनी रुग्णालयास भेट दिली. रुग्णालयात तपासणी, तसेच नावनोंदणी करुन प्रवेश देण्यात येतो. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×