भोंग्याविरोधात किरीट सोमय्या यांच्याकडून कारवाईची मागणी

फरासखाना पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना निवेदन

marathinews24.com

पुणे – भोंग्याविरोधात किरीट सोमय्या यांच्याकडून कारवाईची मागणी – मुंबईत प्रार्थना स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहे. भोंग्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून, पुणे पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी केली. सोमय्या यांनी रविवारी फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांटी भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.

नागरिकांचा न्यायदानावरील विश्वास दृढ करण्याची न्यायाधीश व वकिलांची महत्त्वपूर्ण जबाबदारी-उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे – सविस्तर बातमी

‘उच्च न्यायालयाने जानेवारी २०२५ मध्ये भोंग्यााबाबत आदेश दिले आहेत. ५० डेसिबलपेक्षा आवाज जास्त नसावा असे आदेशात म्हंटले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. मुंबईत भोंगे हटविण्यात आले आहेत. मुंबईप्रमाणे पुण्यातही भोंग्यावर कारवाई करण्यात यावी, असे पत्र मी पुणे पोलिसांना दिले आहे. याबाबत फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

पुण्यातील मध्यभागात १४ प्रार्थनास्थळे आहेत. परवानगी न घेतलेले भोंगे, तसेच निर्देशांचे पालन न करता भोंगे वाजवित असल्याचे दिसून आल्यास कारवाई करण्यात यावी. मुंबईप्रमाणे पुणे पोलिसांनी कारवाई करावी’, असे सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याबाबत पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे, असे सोमय्या यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×