Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Koregaon Park Land Scam Case : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दोन स्वीय सहायकांना नोटीस

Koregaon Park Land Scam Case

कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण; १० जणांचे जबाब नोंदविणार

marathinews24.com

पुणे – Koregaon Park Land Scam Case : शहरातील कोरेगाव पार्क (मुंढवा) जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दोन स्वीय सहायकांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस बजाविण्यात आली आहे. ‘गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांच्या वकिलांनी दिलेल्या अर्जानंतर तपासाच्या अनुषंगाने ही नोटीस बजाविण्यात आली आहे,’ अशी माहिती पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात आणखी १० जणांचे जबाब नोंदविण्यात येणार आहे.

पशुधनासाठी चारा उपलब्धतेसाठी राज्यभर ‘मिशन मुरघास’ मोहीम – सविस्तर बातमी 

‘जमीन गैरव्यवहार प्रकरणाची माहिती ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ कंपनीतील संबंधित व्यक्तींना होती,’ असा दावा या प्रकरणातील आराेपी शीतल तेजवानी यांच्या वकिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केला आहे. ‘संबंधित तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सुनेत्रा पवार यांच्या दोन स्वीय सहायकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आठ ते दहा जणांची चौकशी केली जाणार आहे, तसेच त्यांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. त्यानुसार तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन ते तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’कंपनीने कोरेगाव पार्क भागातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, बोपोडीतील जमीन प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शीतल तेजवानी आणि ‘अमेडिया’ कंपनीचा संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. कोरेगाव पार्क जमीन प्रकरणात तेजवानींचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. कोरेगाव पार्क (मुंढवा) जमीन प्रकरणात २७५ जण आहे. ही जमीन कुलमुख्यारपत्र करून शीतल तेजवानी यांना संबंधित व्यक्तींनी दिली होती.

‘अमेडिया’ कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांनी शीतल तेजवानीकडून शेतजमीन नावावर असलेल्या व्यक्तींचे कुलमुखत्यारपत्र तयार करून घेतले. कोरेगाव पार्कमधील ४० एकर जमिनीचा व्यवहार ३०० कोटी रुपयांत करण्यात आला. माहिती-तंत्रज्ञान पार्कच्या नावाखाली उद्योग संचालनालयाकडून इरादा पत्र घेण्यात आले. त्यानुसार मुद्रांक शुल्क सवलत देण्याबाबतचा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुद्रांक शुल्कात २१ कोटी रुपयांची सवलत देण्यात आली. संबंधित जमिनीची जुनी कागदपत्रे, सातबारा उतारे, त्यावर बदलत गेलेल्या नोंदी, तसेच अन्य कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांतधिकारी कार्यालय, मुद्रांक शुल्क कार्यालय, महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळवली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×