Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

‘सीएसजे सुवर्ण सफर’ उपक्रमाचा शुभारंभ

गुणवत्ता व शुद्धतेचा आता आलिशान बसमध्ये

marathinews24.com

पुणे – गुणवत्ता व शुद्धतेचा १८२७ पासून वारसा जपणाऱ्या चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या वतीने ‘सीएसजे सुवर्ण सफर’ या ज्वेलरी ऑन व्हील्स उपक्रमाची घोषणा चंदुकाका सराफ ज्‍वेल्‍सचे संचालक सिद्धार्थ अतुल शहा यांनी सोमवारी (दि.२२) पत्रकार परिषदेत केली. नवकल्पनांचा संगम घडवून आणत आपल्या ग्राहकांना नेहमीच काहीतरी वेगळे देण्याचा चंदुकाका सराफ ज्वेल्सचा कायमच प्रयत्न असतो, याच परंपरेला पुढे नेत ‘सीएसजे सुवर्ण सफर हा उपक्रम हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. सीएसजे सुवर्ण सफर’ या उपक्रमाचा शुभारंभ चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक अतुल शहा व संगीता शहा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या संचालिका स्वीटी बागी उपस्थित होत्या.

साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – सविस्तर बातमी

सिद्धार्थ अतुल शहा म्हणाले , “सीएसजे सुवर्ण सफर उपक्रमाअंतर्गत आम्ही आलिशान बसचे रुपांतर संपूर्णपणे सुसज्ज अशा दागिन्यांच्या शोरूम मध्ये केले असून. या बसमध्ये ग्राहकांना दुकानातील खरेदीचा आनंद त्यांच्या घर अथवा ऑफिसच्या जवळ देखील घेता येणे शक्य होणार आहे. फिरत्या शोरूममध्ये सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांचे मनमोहक प्रकार खरेदीसाठी उपलब्ध असून चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या अनुभवी तज्ज्ञांच्या उपस्थितीत शोरूम प्रमाणेच ग्राहकांना विश्वासार्ह व सहज दागिने खरेदीचा अनुभव या आलिशान बसमध्ये देखील घेता येईल. ‘सीएसजे सुवर्ण सफर’ ची यात्रा महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील गावांपासून सुरू होत असल्याचे सांगत सिद्धार्थ शहा पुढे म्हणाले की, या उपक्रमामुळे ज्या ग्राहकांना आमच्या पर्यंत पोहोचणे शक्य नाही अशांपर्यंत आता आम्ही स्वत: पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. शिवाय या उपक्रमाद्वारे ग्राहकांनाही सोने, हिरे व चांदीच्या दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स व अप्रतिम व्हारायटी असलेले असे आमचे नवे एक्सक्लुसिव्ह कलेक्शन मनसोक्त पाहता येईल.

याशिवाय १८२७ पासून परंपरा व विश्वासाचा वारसा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स यंदाच्या दसरा दिवाळीत आपल्या ग्राहकांसाठी खास ग्रँड फेस्टिव्ह ऑफर देखील घेऊन आले आहेत. सणासुदीच्या उत्साहात भर घालत भव्य दसरा दिवाळी ऑफर या फिरत्या शोरूममध्येही लागू राहणार आहे. दसरा दिवाळीच्या या प्रकाशमय वातावरणात चंदुकाका सराफ ज्वेल्स मधून केलेली प्रत्येक खरेदी अधिकच झगमगती आणि संस्मरणीय ठरेल असा विश्वास यावेळी सिद्धार्थ शहा यांनी व्यक्त केला. ‘सीएसजे सुवर्ण सफर’ या अभिनव उपक्रमाद्वारे चंदुकाका सराफ ज्वेल्स ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेतच शिवाय आपल्या परंपरेचा वारसा, विश्वास आणि दागिन्यांचे सौंदर्य देखील ते ग्राहकांच्या दारात आणून ग्राहकांची सोय करीत आहे हे विशेष.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×