Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

व्याख्याते सोळुंके यांनी दिली ५ हजार ७४८ पुस्तके

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुस्तक वाटप

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – मराठा सेवा संघाच्यावतीने आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित संत तुकोबाराय व्याख्यानमालेत स्तुत्य उपक्रम पार पडला. छत्रपती संभाजीनगर येथील जिजाऊ मंदिर येथे व्याख्याते प्रदीप सोळूंके यांनी मुलीच्या वसतिगृहाला विविध विषयांचे तब्बल ५ हजार ७४८ पुस्तकाची भेट दिली आहे. भेट दिलेल्या पुस्तकाची संत तुकोबाराय व्याख्यानमालेत नोंद झाली आहे.

धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या अंतर्गत, वक्ते प्रदीप सोळुंके यांनी वैयक्तिक ग्रंथालयातील ५ हजार ७४८ पुस्तके मुलींच्या वसतिगृहाला भेट देत अनोखा आदर्श निर्माण केला आहे. प्रदीप सोळुंके यांनी व्याख्यानातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वावर प्रकाश टाकला. विद्यार्थीनी या पुस्तकांतून ज्ञान संपादन करून आपले मस्तक सशक्त करावे, असे मार्गदर्शन सोळुंके यांनी केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टी. आर. जाधव, प्रा. चंद्रकांत भराट संस्थापक प्रदेशाध्यक्ष, छावा, डी. एम.पाटील जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ, धनंजय पाटील विभागीय अध्यक्ष, प्रा. विजया मुसंडे आणि देवरावजी पतंगे उपस्थित होते. सूत्रसंचालन संजीव साठे यांनी केले, तर आभार वैभव बोडखे यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×