Breking News
ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालन

माजी आमदाराची बनावट सही करुन ३० कोटींच्या कर्जाचे वितरण

माजी आमदाराची बनावट सही करुन ३० कोटींच्या कर्जाचे वितरण

कर्ज फेडूनही तारण ठेवलेल्या मिळकतीच्या जप्तीची नोटीस; वित्तीय संस्थेतील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच त्यांच्या कंपनीतील संचालकांची बनावट स्वाक्षारी करुन विविध बँक खात्यांवर ३० कोटींचे कर्ज वितरित झाल्याचे बनावट कागदपत्रे तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खासगी वित्तीय संस्थेतील अधिकाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मनीष एकनाथ मोरणकर (वय ५२, रा. विशालनगर, पिंपळे निलख), शकिल नदाफ (वय ५५, रा. मुंबई) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजवर्धिनी संजय जगताप (वय ४३, रा. सासवड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वारकरी महिलेच्या अंगावर मांस फेकले, आरोपीविरुद्ध लष्कर ठाण्यात गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, राजवर्धिनी जगताप लष्कर भागातील सिल्व्हर ज्युबिली मोटर्स कंपनीच्या कार्यकारी संचालक आहे. संबंधित कंपनीच्या संचालक मंडळावर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य आहेत. २०११ मध्ये त्यांनी व्यावसायिक कामानिमित्त खासगी वित्तीय संस्थेकडून ३० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांनी सिल्व्हर ज्युबिली कंपनीच्या मालकीची एक मिळकत तारण ठेवली होती. २०१८ पर्यंत त्यांनी कर्जाची परतफेड केली. त्यावेळी राजवर्धिनी, त्यांचे पती , संजय जगताप, कुटुंबातील अन्य सदस्य आणि किरण पालसिंग अहलुवालिया हे कंपनीच्या संचालक मंडळावर होते. त्यावेळी मोरणकर, नदाफ हे एका खासगी वित्तीय संस्थेत अधिकारी होते.

संबंधित खासगी वित्तीय संस्था आणिा ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे एकत्रीकरण झाले. त्यानंतर मोरणकर हे ऑथम कंपनीत रुजू झाले. २०२३ मध्ये ऑथम कंपनीकडून सिल्व्हर ज्युबिली कंपनीच्या संचालकांना नोटीस मिळाली. सिल्व्हर ज्युबिली कंपनीने २०११ मध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात आली नसून, तारण ठेवलेली मिळकत जप्त करण्यात येणार आहे, असे नोटिशीत म्हटले होते. याबाबत चौकशी केल्यावर राजवर्धिनी यांना कर्ज प्रकरणावर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या तसेच सिल्व्हर ज्युबिली कंपनीच्या सदस्यांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे आढळून आले.

त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली. राजवर्धिनी यांच्यासह जगताप कुटुंबीयांचे बँक व्यवहार तपासण्यात आले. त्यांनी कर्जाची परतफेड केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीकडे चौकशी केली. मात्र, कंपनीकडून पोलिसांना कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते तपास करत आहेत.

आरोपींनी फिर्यादी, तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य, सिल्व्हर ज्युबिली मोटर्स कंपनीचे तत्कालीन संचालक किरणपालसिंग अहलुवालिया, तसेच त्यांचे भाऊ मनमोहनसिंग अहलुवालिया यांच्या नावावर असलेली संयुक्त मिळकत बळकाविण्याच्या उद्देशाने संगनमत करून कट रचला. आरोपींनी कर्ज प्रकरणाची खोटी आणि बनावट कागदपत्रे तयार केली. त्याच्यावर फिर्यादी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, तसेच कंपनीचे माजी संचालक यांच्या बनावट स्वाक्षरी केली.

आरोपींनी तीन बँक खात्यांवर एकूण ३० कोटींचे कर्ज वितरित केल्याबाबत बनावट कागदपत्रे तयार केली. आरोपींनी फिर्यादी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती तसेच त्यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे राजवधिनी जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तक्रार अर्जाची प्राथमिक चौकशी करुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई केली जाईल.- रवींद्र गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×