Breking News
कोथरूडमध्ये ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीकडून बंदबीडीपी आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेशहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाडराज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्तमातंग समाजाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार…एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

Maharashtra Krushi Din 2025 : देशाची भूक भागवणाऱ्या बळीराजाच्या सन्मानाचा दिवस…

Maharashtra Krushi Din 2025

हरितक्रांतीपासून शाश्वत शेतीकडे वाटचाल; नव्या पिढीचा आधुनिक शेतीकडे कल, शासनाच्या भक्कम धोरणांची अपेक्षा

marathinews24.com

पुणे (रेवणसिद्ध कोळेकर) : महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै हा महाराष्ट्र ‘कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त साजरा केला जातो. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. या कृषिप्रधान देशांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे कितीही जागतिकीकरण, औद्योगीकरण वाढत गेले तरी भारत हा कृषिप्रधान देश म्हणूनच गणला जाईल, व उद्याच्या भारताचे भविष्य देखील शेतीच आहे.

देशाची जवळपास ६०% लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे देशामध्ये वाढणाऱ्या बेरोजगारीचे संकट शेतीच दूर करू शकते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तात्कालीन राज्यकर्त्यांनी अनेक धोरणे आखली, त्याचा परिणाम म्हणून अन्नधान्य विना भुकेने कुपोषित होणारी मुले भारत हा कुपोषणाने मुले मरणारा देश ही ओळख पुसू लागली. देशामध्ये हरितक्रांती होऊन ज्यामध्ये उच्च उत्पन्न देणाऱ्या वाणांचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यात आले. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करून उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. यामध्ये बियाणे, खते, सिंचन व्यवस्था आणि कीटकनाशकांचा वापर केला.

स्वच्छतेचे महत्व मनामनात ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला – सविस्तर वाचा 

सध्याच्या घडीला पाहायला गेले तर १४० कोटी लोकांची भूक भागवून अन्नधान्य निर्यात करणारा देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण झाली आहे. आज देशांमध्ये साखर, गहू, कांदा, फळे, अन्नधान्य मोठ्या प्रमाणात उत्पादित करणार देश आहे. यामध्ये जर सरकारी पातळीवरून आयात-निर्यात धोरणांची नियोजन अचूकपणे झाले तर शेतीला आणखीन बळकटीकरण मिळू शकणार आहे.

शाश्वत शेतीचा प्रयोग हवाचं..!

भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सन १९६० च्या दशकात हरित क्रांती झाली. शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, आधुनिक संकरित बियाणे याचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. यामुळेच आपण गेल्या सत्तर-पंच्याहत्तर वर्षापासून हरितक्रांतीची फळे भारताने व जगाने चाखली आहेत. परंतु आता दीर्घकालीन धोरण आखल्याशिवाय पुढील काळात देशाच्या वाढत्या लोकसंख्येची भूक भागवणे व कृषी क्षेत्राचा जगात दबदबा निर्माण करणे शक्य होणार नाही. वारंवार रासायनिक खतांचा वापर करून, पाण्याचा असंतुलित वापर करून जमिनीमधील उत्पादन क्षमता संपत चालली आहे. एक पीक पद्धतीमुळे जमिनीची उत्पादन क्षमता घटली आहे. वारंवार कीटकनाशक व तणनाशकाच्या अतिवापरामुळे मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे आता विषमुक्त अन्नधान्याची गरज वाढली आहे.

शेतीमध्ये तात्पुरता नफा मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून नफा देणारी शेती करायची नाही तर सध्या शाश्वत शेती बनवण्याची गरज आहे. जी की पुढच्या पिढीच्या हातात सुरक्षितपणे सोपवायची आहे. त्यासाठी केमिकल युक्त खतांचा वापर करून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरण्याचे काम करावे लागणार आहे. एक पीक पद्धतीला फाटा देऊन फेरपालट करणे, (म्हणजेच जमिनीमध्ये वेगवेगळे पिके घेणे) यामध्ये सर्वाधिक सेंद्रिय खतांचा वापर करून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे. मातीला पुन्हा जिवंत करण्यासाठी मातीतली जैव साखळी टिकवावी लागेल. तरच आपण पुढच्या पिढीला क्षारयुक्त, रोगराईमुक्त, सुरक्षित जमीन देऊ.

देशातील शेतकरी बदलतोय…

शेतकरी म्हटलं की मळके कपडे घातलेला, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेला एक करपलेला चेहरा डोळ्यासमोर येतो. ‘पोरा शिक’ नाही तर तुला शेतीच करावी लागेल, म्हणजेच अडाण्यांनीचं शेती करायची ही म्हण आत्ता पुसत चालली आहे. प्रतिकूल हवामान, गारपीट, कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, बाजार भाव आयात-निर्यातीचे धोरण अशा सुलतानी समस्या शेतकऱ्यासमोर आहेतच. पण अशा सर्व संकटातून मार्ग काढत राज्यातील – देशातील नवी तरुणाई शेतीमध्ये एक व्यवसाय नव्याने उतरत आहे. कमी अधिक शिकलेल्या तरुणासोबतच आता उच्चशिक्षित तरुण देखील शेतीमध्ये उतरून नव्या वाटा चोखळत आहे. तसं पाहायला गेलं तर मुळात आता अज्ञानी माणसाची शेती राहिलीच नाही.

देशातील बदललेला शेतकरी प्रवाही पद्धतीने पाणी न देता ठिबक सिंचन प्रणाली बसून वीज पंप रिमोट कंट्रोल द्वारे चालू बंद करतो. केवळ आता व्हॉल्व फिरवण्याचे काम करतो, माती परीक्षण करूनच शेतीमध्ये कोणती खते टाकायचे आणि कोणती टाळायची व त्यामधून खर्च कसा वाचवायचा हा बदललेला शेतकरी करतोय. ट्रॅक्टर द्वारे कमी वेळेत मशागत करून इंजिन अथवा ड्रोन द्वारे कमी वेळात फवारणीचे तंत्र ही आत्मसात करून मजूरटंचाईवर देखील मात करत आहे. त्यामुळे बदललेला शेतकरी हा नव्या उमेदीने शेतीला व्यवसाय म्हणून पहात आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर शेतकऱ्यांच्या नव्या वाटा

अलीकडच्या काळात शेतीबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय शेतकरी करत आहेत. यामध्ये गायगोठा, शेळीपालन, मेंढी पालन, कुक्कुटपालन, खेकडेपालन यासारखे आणि शेतीशी निगडित व्यवसाय करत आहेत. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी यशस्वी जोडधंदे करून दाखवले आहेत. पूर्वी संशोधन केंद्राचा आणि शेतकऱ्यांचा फारसा संबंध येत नव्हता परंतु आता राज्यातील कृषी विज्ञान केंद्र, पाडगावचे ऊस संशोधन केंद्र, राहुरी विद्यापीठ, दापोली संशोधन केंद्र येथे शेतकऱ्यांची वर्दळ वाढलेली दिसून येते. नवनवे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी इथे अनेक शेतकरी येत असतात यामध्ये सर्वाधिक तरुणांचा सहभाग असतो. अस्मानी-सुलतानी संकटाशी लढताना अपयश आले तरी चालेल पण पुन्हा-पुन्हा उभे राहण्याची शेतकऱ्यांची वृत्ती या नव्या तरुणांमध्ये दिसून येत आहे.

शेतकऱ्यांविषयी शासनाचे धोरण

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणि धोरणे शासन स्तरावर राबवले जातात. यामध्ये सिंचन सुविधा, कर्जपुरवठा, विमा योजना, बाजारपेठ आणि तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. शासनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि कृषी क्षेत्राला अधिक चांगले सक्षम बनवणे हे शासनाचे धोरण आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी शासनाने जर भक्कमपणे शेतकऱ्यांविषयी अधिकची चांगली धोरणे राबवली तर देशातील शेतकरी नक्कीच समृद्ध होईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top