Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Mahatma Jyotirao Phule : विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित, समावेशक व कौशल्य आधारित शिक्षणाची जोपासना करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचे संवर्धन आवश्यक

Mahatma Jyotirao Phule

द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

marathinews24.com

पुणे – Mahatma Jyotirao Phule : महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजात सामाजिक समता स्त्री शिक्षण शेतकरी कल्याण व सामाजिक न्याय या क्षेत्रात केलेले कार्य अद्वितीय आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित, समावेशक व कौशल्याधारित शिक्षणाची जोपासना करण्यासाठी त्यांच्या विचारांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने त्यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील दहा दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा – सविस्तर बातमी 

या अनुषंगाने सर्व शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याविषयी नियमित पुस्तक वाचनाचा संकल्प करावा. त्यासाठी शाळांना पुस्तके पुरवून वाचनालये ही ज्ञान केंद्रे म्हणून स्थापन करावीत. त्यांच्या कार्यावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करावे, स्त्री शिक्षणाचे महत्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतीराव फुले (Mahatma Jyotirao Phule) यांचे स्फूर्तीदायी लेखन व विचार यावर परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करावीत.

द्विशताब्दी जयंती वर्षा निमित्त ११ एप्रिल २०२७ पर्यंत आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत चर्चासत्रे, शैक्षणिक प्रबंध सादरीकरण, महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह, पथनाट्य, एकपात्री नाटक, जलसंवर्धन अभियान, स्वच्छता अभियान, शाळा स्तरावर भित्तीपत्रक अभियान, कार्यशाळा आयोजित कराव्यात, असे शासनाचे निर्देश आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×