Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

कारागृहाबाहेर पडताच गांजा तस्करी

कारागृहाबाहेर पडताच गांजा तस्करी

सराइताला अटक; २६ किलो गांजा जप्त

marathinews24.com

पुणे – कारागृहाबाहेर पडताच गांजा तस्करी – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) केेलेल्या कारवाईत शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या सराइताला गांजा तस्करी प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाने गजाआड केले. त्याच्याकडून पाच लाख ३६ हजार रुपयांचा २६ किलो गांजा, मोटार, मोबाइल संच असा २१ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १९ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त – सविस्तर बातमी 

याप्रकरणी अनिल उर्फ अण्णा सुभाष राख (वय ४६, रा. काळेपडळ, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये राख याच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राख हा सराइत आहे. हडपसर भागातील खून प्रकरणात २०१४ मध्ये त्याच्याविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून तो कारागृहातून सहा ते सात महिन्यांपूर्वी बाहेर आला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने गांजाची तस्करी सुरू केल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांनी दिली.

अमली पदार्थ विरोधी पथक फुरसुंगी भागात गस्त घालत होते. त्या वेळी राख हा मोटारीतून कात्रज-मंतरवाडी रस्त्यावर मोटारीतून आला होता. त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. मोटारीतून २६ किलो गांजा जप्त करण्यात आला. राखने गांजा कोणाकडून आणला, तसेच तो काेणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, प्रवीण उत्तेकर, विनायक साळवे, विशाल दळवी, सचिन माळवे, नागेश राख, संदीप शिर्के, सुहास डोंगरे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे-पाटील आणि पथकाने ही कारवाई केली.

शहरात गांजा विक्री, तस्करीचे प्रकार वाढले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ विरोधी तस्करांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गांजा अन्य अमली पदार्थांच्या तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळे गांजाला मागणी वाढती आहे. सराइत, तसेच महाविद्यालयीन युवकांकडून गांजा ओढला जातो. अल्पवयीन मुले गांजा ओढत असल्याचे दिसून आले आहे. अन्य अमली पदार्थांच्या तुलनेत गांजा तस्करी आणि विक्रीचे प्रमाण जास्त आहे.

वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती ही मूळची राजस्थान येथील रहिवासी आहे. ती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. मंगळवारी रात्री तिने वसतिगृहाच्या मोकळ्या खोलीत गळफास घेतला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती बंडगार्डन पोलिसांना दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून चिठ्ठी जप्त केली आहे. ज्योतीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती. आत्महत्येमागील निश्चित कारण समजू शकलेले नाही, अशी महिती बंडगार्डन पोलिसांनी दिली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती ज्योतीच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. कुटुंबीय राजस्थानहून पुण्याकडे रवाना झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×