मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांची बैठक संपन्न

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी राजकीय पक्षांना सक्रिय सहकार्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली.

निर्यात वाढीसाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करा- अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत – सविस्तर बातमी

उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित बैठकीत विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती, आयोगाने जाहीर केलेले वेळापत्रक तसेच जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरावर आवश्यक समन्वय ठेवणे, पात्र मतदारांची नोंदणी वाढविणे, नाव वगळणे किंवा दुरुस्ती प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच व्यापक प्रसिद्धी करण्यावर भर देण्यात आला. मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम,विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, निवडणूक विभागातील अधिकारी उपस्थित होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×