Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पंजाबमधून पळवून आणले

Pune Crime News : भरदिवसा सहकारनगरमध्ये जेष्ठेचे मंगळसूत्र हिसकावले

धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे उघड

marathinews24.com

पुणे –  अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पंजाबमधील लुधियाना शहरातुन पुण्यात आणण्यात आले. विवाहेच आमिष दाखवून तिच्यावर धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), तसेच ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद रईस मोहम्मद रफीक शेख (वय २१, मूळ रा. फिरोजपूर, मलीहाबाद, लखनौ, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मार्कटयार्ड परिसरात महिलांचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील हे शिवणकाम करतात. ते मूळचे उत्तर प्रदेशातील फिरोजपूरचे असून, गेल्या १६ वर्षांपासून ते पंजाबमधील लुधियाना शहरात स्थायिक झाले आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची १७ वर्षांची मुलगी लुधियानातील शाळेत शिक्षण घेत होती. १४ ऑगस्ट २०२५ रोजी ती घरातून शाळेत जाते, असे सांगून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नाही. मुलगी घरी न परतल्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार वडिलांनी लुधियानातील सराभानगर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर मुलीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर मुलीने ३० जुलै २०२६ रोजी आईच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. उत्तर प्रेदेशातील मूळगाव फिरोजपूर येथे राहणारा आरोपी तरुण शेख याच्यासोबत पुण्यातील हडपसर भागात वास्तव्य करत असल्याचे तिने सांगितले.

मुलीने तिचे वास्तव्याचे ठिकाण (लोकेशन) आईला पाठविले. तेव्हा मुलगी फुरसुंगी भागातील हांडेवाडी रस्त्यावर आरोपीसोबत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुलीचे वडील आणि काका हे ४ ऑगस्टला फुरसुंगी पोलीस ठाण्यात आले. पोलिसांच्या मदतीने मुलगी आणि आरोपी शेखला पोलीस ठाण्यात आणले. शेखने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुण्यात आणले. तुझे शिक्षण पूर्ण करतो, असे अमिष त्याने दाखविले. त्याने मुलीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. माझ्याशी विवाह करायचा असेल तर तुला धर्म बदलावा लागेल, असे मुलीने कुटुंबीयांना सांगितले. पंजाबमधून मुलीला पळवून नेल्यानंतर आरोपी मुलीला घेऊन अलीगढ, कर्नाटकातील कोलार येथे नेले. गेले दोन महिने आरोपी मुलीसोबत हांडेवाडी येथे राहत होता’, अशी माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले.

मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. बाल न्यायालयाने तिला निरीक्षणगृह ठेवले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ अन्वये पुण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. ५ ऑगस्टला फुरसुंगी पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. दुसरा गुन्हा ९ ऑगस्ट रोजी खडक पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. फुरसुंगी येथील गुन्ह्यात अल्पवयीन मुलीवर धर्मांतरण कण्यासाठी दबाव आणला होता. खडक पोलीस ठाण्यात धर्मगुरुविरुद्ध धर्मप्रसार केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपायुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×