Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

पुण्यात मॉडीफाईड वाहन चालक, गॅरेजमालक पोलिसांच्या रडारवर

पोलिसांसह वाहतूक शाखेची मोहिम

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात मॉडीफाईड वाहन चालकांनी नागरिकांना वेठीस धरल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांसह वाहतूक शाखेने संबंधित विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासोबतच वाहनांमध्ये बदल करून देणार्‍या गॅरेज मालकाविरूद्धही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांनी दिला आहे. त्यामुळे वाहन चालकांनो वेळीस सावध व्हा, अन्यथा कारवाईच्या जाळ्यात अडकल्यानंतर सुटका होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लिक्विड खरेदीच्या बहाण्याने कंपनीला ४८ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

बेशिस्त दुचाकीस्वारांकडून रात्री-अपरात्री विविध भागात हैदोस घातला जात असून, नागरिकांना मनस्ताप दिला जात आहे. दुचाकीस्वार मॉडीफाईड वाहनांद्वारे सायलेन्सर मधील फटाके फोडणे, कर्णकर्शशः हॉर्न वाजवणे, घोळक्याने एकत्रित येउन रॅली काढणे, सलग हॉर्न वाजवून सर्वसामान्यांना वेठीस धरत आहेत. त्यापार्श्वभूमीवर संबंधित बेशिस्तांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांची वाहने जप्त करण्याचे आदेश देण्यात आहेत. शहरभर स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांकडून कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. महत्वाच्या चौकात संयुक्त मोहिमेद्वारे दुचाकीस्वार, मोटार चालकांना अडवून दंडात्मक कारवाई करणे, वेळप्रसंगी वाहने जप्त केली जाणार आहेत.

वाहनांमध्ये फेरफार करणारे गॅरेजमालकही रडारवर

दुचाकींच्या सायलेंन्सरमध्ये फेरफार करणे, मोठमोठे हॉर्न बसवून देणे, वाहनात नियमबाह्य बदल करणे, मोटारींना काळ्या काचा बसवून देणे, यासह वाहनांमध्ये विविध प्रकाराचे फेरफार करणारे गॅरेजचालक आणि मालकांची पोलिसांनी यादी बनवली आहे. प्रामुख्याने नाना पेठ, स्वारगेटमधील वेगा सेंटरजवळील २५ ते ३० दुकानदार, हडपसर, वाघोली परिसरातील दुकानदार पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्याकडून सातत्याने वाहनांचे मॉडीफिकेशन केले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. वाहतूक उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली जात आहे.

शहरात काही बेशिस्त वाहन चालकांकडून बेफिकीरचे प्रदर्शन केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाईची मोहिम स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी हाती घेतली असून, मॉडीफाईड दुचाकीस्वारांसह गॅरेज चालक, मालकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

संजय दराडे, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×