Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी खासदार बारणे यांच्या विरोधात खटला चालवला जाणार

निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी खासदार बारणे यांच्या विरोधात खटला चालवला जाणार

 शपथपत्रात खोटी माहिती देण्याची अनिल भांगरे आणि डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी केली होती तक्रार

marathinews24.com

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी मावळ विशेष न्यायालयात खटला चालवला जाणार आहे .श्रीरंग बारणे यांनी निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती देण्याची तक्रार अनिल भांगरे आणि डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी न्यायालयाकडे केली होती .

मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात बदल करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

बारणे यांनी 2009 आणि 2019 च्या निवडणूक दरम्यान नामनिर्देशन पत्रासोबत दिलेल्या शपथपत्रात जाणून-बुजून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2019 च्या शपथपत्रात बारणे यांनी शैक्षणिक पात्रता दहावी नापास अशी नमूद केली होती ,तर 2009 मध्ये त्यांनी दहावी उत्तीर्ण सन 1989 असे लिहिले होते. याशिवाय त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात पिंपरी चिंचवड न्यायालयातील एक प्रकरण आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा समावेश आहे. शपथपत्रातील शैक्षणिक पात्रतेतील विसंगती आणि प्रलंबित प्रकरणाविषयी दिलेली अपुरी माहिती लक्षात घेऊन न्यायालयाने याबाबत वडगाव मावळ पोलिसांना चौकशीचे आदेश दिले .

पोलिसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानंतर डॉक्टर हरिदास यांनी युक्तीवाद केला. या निष्कर्षाच्या आधारे न्यायालयाने बारणे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 125 अ अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यास पुरेशी कारणे असल्याचे नमूद केले असून त्या विरोधात प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×