Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

चारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

चारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

वाघोलीतील घटना

marathinews24.com

पुणे – चारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून करण्यात आल्याची घटना वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात घडली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पसार झाला आहे. रिहाना खातून (वय २६, सध्या रा. शिवलक्ष्मी बिल्डींग, आव्हाळवाडी रस्ता, वाघोली, मूळ रा. नोेंदईगाजन, भागनपूर, जि. मेदनपूर, पश्चिम बंगाल ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान राजेसाब बोदले खान (वय ३१, रा. आदर्शनगर, लोहगाव, मूळ रा. गदग, कर्नाटक) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखविल्याने तरुणाची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि रिहाना हे विवाह न करता वाघोलीत एकत्र राहत होते. दोघे जण पती, पत्नी असल्याचे भासवत होते. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी रिहानाच्या चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणावरुन त्यांच्यात वाद व्हायचे. २८ मे रोजी त्यांच्यात वादावादी झाली. आरोपीने रिहानाला मारहाण करुन तिचा खून केला. त्यानंत घराला कुलूप लावून आरोपी पसार झाला.

आरोपी राहत घरात असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी पोलिसांकडे दिली. पोलिसांनी घराचे कुलूप तोडले. तेव्हा रिहाना मृतावस्थेत सापडली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर, सहायक आयुक्त नूतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×