Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

Neelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न

Neelam Gorhe Residence Case

तरुणाकडून हातोडा, पक्कड जप्त

marathinews24.com

पुणे – विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या शिवाजीनगर भागातील निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न (Neelam Gorhe Residence Case) केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी तरुणाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. गोर्‍हे यांचे शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीत निवासस्थान आहे. शनिवारी (२६ सप्टेंबर) सकाळी सव्वासहाच्या सुमारास तरुण बंगल्यात शिरला. डॉ. गोर्‍हे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचारी आणि सुरक्षारक्षकाने त्याला पकडले.

कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावा – सविस्तर बातमी 

Neelam Gorhe Residence Case तरूणाकडील पिशवीत हातोडा, पक्कड, हातमोजे, दहा मीटर लांबीची दोरी सापडली. निवासस्थानात प्रवेश केल्यानंतर त्याने पाण्याच्या टाकीतील नळजोड बंद केला होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने विद्यार्थी असल्याचे सांगितले. त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रे सापडली. गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी तरुण डॉ. गोर्‍हे यांच्या निवासस्थानात का शिरला, त्याची खरी ओळख काय आहे ? यादृष्टीने तपास करण्याची गरजा असल्याचे डॉ. गोर्‍हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तरुणाला सोडविण्यासाठी काही राजकीय व्यक्तींकडून दबाब आणला जात असल्याची माहिती मिळाली आहे. तरुणाचा चोरीचा हेतू होता का आणखी काही ? यादृष्टीने सखोल तपास करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानात बेकायदा प्रवेश करणे, तसेच त्याच्याकडे हातोडा सापडणे ही गंभीर बाब असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×