मस्साजोग ग्रामसभेत आवादा कंपनीला दिलेली एनओसी रद्द

अटी-शर्ती मान्य असतील तरच कंपनी चालू देणार

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – मस्साजोग ग्रामपंचायतकडून आवादा कंपनीला दिलेली एनओसी रद्द करण्यात आली आहे. ग्रामसभेमध्ये तसा ठराव घेण्यात आला. अटी-शर्ती आवादा कंपनीला मान्य असतील तरच ही कंपनी मस्साजोग मध्ये चालू देणार आहोत. आतापर्यंत आवादा कंपनीचा गावांसाठी कुठलाही फायदा नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका ; क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर – सविस्तर बातमी

मस्साजोग ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सरपंच पद स्वीकारण्याचा कार्यक्रम आणि ग्रामपंचायत कडून ग्रामसभेचे आयोजन (दि.४) सोमवारी करण्यात आले होते. गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच स्वारुपानंद देशमुख यांच्याकडून सरपंच पदाचा पदभार स्वीकारण्यात आला. त्यानंतर हनुमान मंदिर येथे ग्रामपंचायत कार्यालयाकडून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेत गावकऱ्यांनी नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार केला. दिवंगत संतोष देशमुख आणि स्वर्गीय आसाराम देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. गावातील ग्रामस्थांचे प्रलंबित प्रश्न त्यामध्ये ओबीसी आणि इतर मागासवर्गीय समाजातील लोकांच्या समशान भूमी , गावातील बंद पडलेले सिसीटिव्ही कॅमेरे सुरू करण्यात यावे, गावातील रस्ते, घरकुल, गायगोठा, पाणी, विहिरीसह अन्य गावातील विकास कामाचे प्रश्न ग्रामसभेत मांडले. यावेळी ग्रामसेवक गव्हाणे आणि नवनिर्वाचित सरपंच स्वारुपानंद देशमुख यांनी लवकरात लवकर सोडवण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले.

मस्साजोगकरांच्या आवादा कंपनीकडे अटी-शर्ती

१) आवादा कंपनीमध्ये मस्साजोगचा ठेकेदार असला तरच चालू देणार

२) आवादा कंपनीत बाहेरचे कर्मचारी आणि वाहने असतील त्यांनी जर मस्साजोगच्या लोकांसह वाहनांना प्रथम प्राधान्य दिले तरच कंपनी चालू देणार

३) आवादा मध्ये काम करणारा कर्मचारी फक्त मस्साजोगचा असावा

४) आवादा कंपनीत जे वाहने असतील ती फक्त मस्साजोगची असावीत.

५) आवादा कंपनीत काम करणारा माणूस फक्त मस्साजोगचा रहिवासी असावा.

अन्य अटी आवादा कंपनीने मान्य केल्या तरच मस्साजोग मध्ये आवादा कंपनी चालू देणार अन्यथा आवादाचा प्रकल्प उठवून लावण्याचे मत ग्रामसभेत मांडण्यात आले आहे. त्यामुळे आता आवादा कंपनी मस्साजोगकरांच्या अटी शर्तीं मान्य करणार का? अन्यथा आवादा कंपनी कोणते पाऊल उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×