Breking News
Fake Job Scam : बनावट भरती घोटाळ्यात जेजुरी देवस्थानचा विश्वस्त अटकेतAnjali Malkar Award : हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान-अंजली मालकरPune Missing Minor Death : पुण्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळलाNilesh Ghaywal MCOCA Acquittal : कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळी निर्दोषPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकForeign Language Training Pune : पुणे जिल्हा परिषद-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा शिक्षण उपक्रम पाच भाषांपर्यंत विस्तारलाSuicide Case : प्रेमात फसवणूक झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्याAccident News : वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यूWorld Rabies Day : सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहातभटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती तालुक्यात ६१ लाभार्थ्यांना विविध सेवांचा लाभ

marathinews24.com

बारामती – ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यानिमित्त राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील (Nomadic Tribes Certificate Campaign) नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पणदरे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ या विशेष मोहिमेला बारामती तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत भित्तीपत्रक व पोस्टर निर्मिती स्पर्धा उत्साहात – सविस्तर बातमी

दि. २७ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या विशेष मोहिमेअंतर्गत बारामती तालुक्यातील संबंधित मंडळाच्या ठिकाणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महा-ई-सेवा केंद्र चालक तसेच आधार सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

Nomadic Tribes Certificate Campaignc: भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी गावागावांत जनजागृती करण्यात आली. शिबिरामध्ये विविध जातींतील ४७ लाभार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले, तर ७ लाभार्थ्यांनी नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी अर्ज सादर केले. तसेच ७ लाभार्थ्यांचे आधारकार्डशी संबंधित कामकाज पूर्ण करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ६१ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळाला.

भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना आवश्यक कागदपत्रे व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत असल्याची माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कळविली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×