Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार

पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा – ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

पशुसंवर्धन विभागाचे सूक्ष्म नियोजन; पारदर्शक अंमलबजावणीवर भर

marathinews24.com

पुणे – पशुसंवर्धन आयुक्तालय तर्फे राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलचे तांत्रिक काम पूर्ण होताच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणे, पशुपालन व्यवसायाला आधुनिक उद्योजकतेचे स्वरूप देणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील युवक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये या योजनेबाबत मोठा उत्साह दिसून येत असून, योजनेची अंमलबजावणी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाने सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे.

भारती विद्यापीठात राष्ट्रीय ‘बीव्हीटेकफ्युजन–२०२६’ उत्साहात – सविस्तर बातमी

लाभार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी महाआयटी कडून विशेष पोर्टल विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोर्टलचे काम पूर्ण होताच योजना अधिकृतपणे सुरू झाल्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले. योजनेसंदर्भातील अधिकृत माहिती, मार्गदर्शन अथवा शंकानिरसनासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी टोल-फ्री क्रमांक १९६२ वर संपर्क साधावा, तसेच नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून माहिती घ्यावी, असे आवाहनही पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×