खराडीत अमली पदार्थ विभागाची कारवाई
marathinews24.com
पुणे – अफुच्या बोंडांच्या चुऱ्याची (पाॅपी स्ट्राॅ) विक्री करण्यासाठी आलेल्या राजस्थानातील एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी भागातून अटक केली. त्याच्याकडून दोन लाख ६१ हजार रुपयांचा १३ किलो ८० ग्रॅम अफुचा चुरा जप्त करण्यात आला. मुकेश बिष्णोई (वय ३०, सध्या रा. खराडकर पार्क, थिटे वस्ती, खराडी, मूळ रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बिष्णोई हा खराडी भागात थांबला होत्या. त्याच्याकडे दोन पोती होती. या पोत्यात अफुच्या बोंडांचा चुरा भरून ठेवला होता.
कौटुंबिक वादातून महिलेच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी
अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवालदार जान्हवी सूर्यवंशी यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून अफुचा चुरा असलेली पोती जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अफुच्या चुऱ्याची किंमत दाेन लाख ६१ हजार रुपये आहे. त्याने अफुचा चुरा कुणाकडून आणला, तसेच कुणाला विक्री करणार होता ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, विठ्ठल साळुंखे, विशाल भिलारे, निशिकांत सावंत, संजय राजे, आशा भिंगारे, जान्हवी सूर्यवंशी, मंगेश गुंड यांनी ही कामगिरी केली.






















