Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Organ Donation Awareness : ‘अवयवदान – जीवनदान’चा संदेश देत कुरकुंभ येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात

Organ Donation Awareness : ‘अवयवदान – जीवनदान’चा संदेश देत कुरकुंभ येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात

सेवा संकल्प अभियानातून अवयवदानाचे महत्त्व आणि प्रक्रियेबाबत मार्गदर्शन; माहितीपूर्ण पोस्टर्सद्वारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न

marathinews24.com

पुणे – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, पुणे यांच्या अंतर्गत सेवा दवाखाना, कुरकुंभ येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत Organ Donation Awareness अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांनी “अवयवदान हे केवळ दान नसून, एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची अमूल्य संधी आहे,” समाजामध्ये अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्ती – सविस्तर बातमी 

यावेळी औषध निर्माता अजिंक्य देसाई यांनी अवयवदानाचे महत्त्व, अवयवदानामुळे गरजू रुग्णांना मिळणारे जीवनदान आणि समाजामध्ये अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. अवयवदानाबाबत समाजात असलेल्या विविध गैरसमजुती दूर करून अधिकाधिक नागरिकांनी या मानवतावादी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Organ Donation Awareness अवयवदानाच्या जनजागृतीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवयवदानाचे महत्त्व, अवयवदानाची प्रक्रिया आणि त्यातून मिळणारे जीवनदान याविषयी विविध माहितीपूर्ण पोस्टर्स तयार करून प्रदर्शनीद्वारे माहिती देण्यात आली. या माध्यमातून उपस्थितांना अवयवदानाबाबत आवश्यक माहिती देण्यात आली.

अधिकारी, कर्मचारी आणि विमाधारकांचा कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अवयवदानाविषयी जनजागृती करताना “अवयवदान – जीवनदान” हा मानवतावादी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

हा उपक्रम वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. रंगदळ, डॉ. तनुजा गवार्ले, डॉ. शुभम मोहोळकर तसेच सेवा दवाखाना, कुरकुंभचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×