Breking News
आकाशवाणी पुणे केंद्रावर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ विषयावर विशेष मुलाखत प्रसारितपुण्यातील मंदिरांना मिळणार नवी ओळखशेतकरी कर्जमुक्तीसाठी नैसर्गिक शेती अभियान ठरत आहे मैलाचा दगडअटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागू

लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा रुग्ण हक्क परिषदेतर्फे आज सत्कार सोहळा

लोककलेच्या जतनासाठी आयुष्य वेचलेल्या रघुवीर खेडकर यांच्या कार्याचा पुण्यात विशेष सन्मान

marathinews24.com

पुणे – लोककलेचे भूषण, महाराष्ट्राचे सुपुत्र, ज्येष्ठ तमाशा कलावंत, लोकशाहीर रघुवीर खेडकर यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रुग्ण हक्क परिषद व कलाप्रेमी नागरिकांच्या वतीने मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात येणार आहे. उद्या बुधवारी (दि. १० जून २०२६) सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड पुणे येथे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा होणार आहे.

ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडत १२ जून रोजी-तहसीलदार स्वप्नील रावडे – सविस्तर बातमी

पार्श्वगायक प्रा. गणेश चंदनशिवे, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, स्वागताध्यक्ष व रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्षा अपर्णा साठ्ये-मारणे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×