Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

वाघोलीत डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपर चालक पसार

marathinews24.com

पुणे – भरधाव डंपरच्या धडकेत पादचारी, दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. वाघोलीतील केसनंद परिसरात फिरायला निघालेल्या एका पादचाऱ्याचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपर चालक पसार झाला.

पुणे महापालिकेचा कर कमी करुन देण्याची बतावणी करून फसवणूक – सविस्तर बातमी

सुधीर हिरामण गायकवाड (वय ५७, रा. केसनंद थेऊर रस्ता, केसनंद, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत गायकवाड यांचा मुलगा स्वप्नील (वय ३३) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर गायकवाड हे दररोज सकाळी फिरायला जायचे. १५ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ते केसनंद-थेऊर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी गोल्डन बारजवळ एक डंपर पाठीमागे येत होता. डंपर चालकाने वेगात डंपर पाठीमागे नेला. डंपरच्या चाकाखाली सापडून गायकवाड हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर घटनास्थळी न थांबता, तसेच कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न करता डंपर चालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार तपास करत आहेत. शहरात डंपर, पाणी वाहतूक करणारे टँकरच्या धडकेत पादचारी, दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. डंपर चालक, टँकर चालकांनी नियमांचे पालन करावे, अशा सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. अपघातास जबाबदार ठरणारे डंपर, टँकर चालकांसह मालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता.

वाघोलीत टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

वाघोली परिसरात टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राम हनुमंत धने (वय २४, रा. वाघेश्वरनगर, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत दुचाकीस्वार उमेश हनुमंत धने (वय २५) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार उमेश आणि त्यांचा भाऊ राम हे पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरुन गुुरुवारी (१६ जुलै) मध्यरात्री निघाले होते. वाघोली परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी राम धने गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातात दुचाकीस्वार उमेश जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक देवगडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×