रिक्षाच्या धडकेत पादचारी ठार, विमाननगरमध्ये घडला अपघात

रिक्षाच्या धडकेत पादचारी ठार, विमाननगरमध्ये घडला अपघात

रिक्षाचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव रिक्षा चालकाने दिलेल्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना २१ जूनला रात्री सव्वा आठच्या सुमारास विमाननगर भागात घडली. मन्सूर अन्वर आलम (वय ५४, रा. ससून क्वार्टर, सोमवार पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचार्‍याचे नाव आहे. मोहम्मद रिहान मन्सूर आलम (वय २६) याने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुण ठार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्सूर आलम हे शनिवारी (२१ जून) रात्री सव्वाआठच्या सुमारास विमननगर भागातून पायी जात होते. त्यावेळी सिंबायोसिस महाविद्यालय प्रवेशद्वार क्रमांक एकसमोर भरधाव रिक्षाने मन्सूर यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मन्सूर यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक जालिंदर बबन शेळके (वय ५७, रा. कळस, आळंदी रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार धेंडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×