Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्तूलासह काडतूस जप्त

सिंहगड रस्ता पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – सराईत गुन्हेगारावर कारवाई करत त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सिंहगड रस्ता पोलिसांनी जप्त केले. आरोपीविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. यश उर्फ दाद्या कमलाकर घोलप (वय १८, रा. आजाद मित्र मंडळाजवळ, चारवड वस्ती, वडगाव बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

लिक्विड खरेदीच्या बहाण्याने कंपनीला ४८ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर हे तपास पथकासह ३० जुलैला गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार विनायक मोहिते, सागर शेडगे यांना रेकॉर्डवरील आरोपी दश उर्फ दादादा घोलप हा गावठी पिस्तूल घेऊन इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील न्यू डी.पी. रस्त्यावरील लेबर कॅम्पजवळ थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयितास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे हे शस्त्र कुठून आले, ते कोणत्या गुन्ह्यासाठी वापरण्याचा त्याचा उद्देश होता आणि त्यामागे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारू, अण्णा केकाण, सतीश मोरे, विकास बांदल, राहुल ओलेकर, संदीप कांबळे, समीर भाऊरावदकर, तानाजी सागर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×