Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

दुचाकीचा धक्का लागल्याने पिस्तुलातून गोळीबार, ६ जण अटकेत

दुचाकीचा धक्का लागल्याने पिस्तुलातून गोळीबार, ६ जण अटकेत

सिंहगड रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – दुचाकीचा धक्का लागल्याने पिस्तुलातून गोळीबार, ६ जण अटकेत – दुचाकीचा धक्का लागल्याने भर रस्त्यात पिस्तुलातून हवेत गोळीबार करुन पसार झालेल्या सहा आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली. सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागात मंगळवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी ही घटना घडली होती.

साहिल अरविंद चव्हाण (वय २४), मंदार यशवंत चव्हाण (वय ३९), प्रशांत यशवंत चव्हाण (वय ३४, तिघे रा. सप्तगिरी हाईट्स, लमाणवाडी, खडकवासला), अभिजित राजू चव्हाण (वय ३१), आकाश भिमा चव्हाण (वय २४ ,दोघे रा. तिरुमल हाईट्स, काेल्हेवाडी, सिंहगड रस्ता), गितेश शंकर जाधव (वय २०, रा. नानाजी व्हिलामागे, खडकवासला) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

डॉ. खेवलकरविरुद्ध मानवी तस्करीचा आरोप – सविस्तर बातमी 

मंगळवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागात आरोपी चव्हाण, जाधव हे दुचाकीवरुन सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागातून निघाले होते. त्यावेळी एका दुचाकीला धक्का लागल्याने आरोपींनी दुचाकीस्वार तरुणाला धमकावून जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी हवेत पिस्तूल उगारून तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी चव्हाण, जाधव हे पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी घटनास्थळावरुन तीन पुंगळ्या जप्त केल्या होत्या.
पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. पसार झालेले आरोपी खडकवासला चौपाटीजवळ थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी स्वप्नील मगर, प्रतिक मोरे, संग्राम शिनगारे यांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून आरोपींना पकडले. आरोपींकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, गुन्हे शाखेचे निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहायक निरीक्षक राहुल यादव, प्रवीण जाधव, उपनिरीक्षक कसबे, पोलीस कर्मचारी संग्राम शिनगारे, राजू वेगरे, प्रतिक मोरे, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भीमराज गांगुर्डे, उत्तम शिंदे, निलेश कुलथे, अक्षय जाधव, सतीश खोत यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×