Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

आरएमसी दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी बीएआय-आरएमसी यांच्यात संयुक्त बैठक

आरएमसी दरवाढीवर बीएआय-आरएमसीमध्ये सकारात्मक चर्चा

marathinews24.com

पुणे  – रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) दरवाढीच्या पार्श्वभूमीवर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटर आणि पुणे आरएमसी असोसिएशन यांच्यात संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम आणि उद्योगासमोरील अडचणी यावर या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर आणि पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांच्या नेतृत्वाखाली यांनी चर्चेचे नेतृत्व केले. या बैठकीला ‘बीएआय’चे माजी उपाध्यक्ष डॉ. आर. बी. कृष्णानी, माजी राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे विभागाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न – सविस्तर बातमी

वाल्हेकर यांनी आरएमसी प्लांटसमोरील अडचणी मांडल्या. तसेच संघटनेची भूमिकाही स्पष्ट केली. आरएमसी उद्योगाला बीएआय पुणे सेंटरकडून पुढील काळातही सहकार्य राहील, अशी ग्वाही देताना अलीकडील आरएमसी दरवाढीबाबत संतुलित आणि संयमित भूमिका घेण्याची विनंती अजय गुजर यांनी केली. या दरवाढीचा बांधकाम क्षेत्र, तसेच सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांवर परिणाम होत असल्याचे ‘बीएआय’तर्फे नमूद करण्यात आले.

यावेळी पुणे आरएमसी असोसिएशनने उद्योगासमोरील कार्यात्मक आणि नियामक अडचणींचा आढावा मांडला. तसेच सर्व संबंधित घटकांना मान्य होईल, असा तोडगा काढण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. आरएमसी दरांचे योग्य नियमन करण्यासाठी बीएआय पुणे सेंटरने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उद्योगाच्या मागण्या मांडाव्यात, अशी विनंतीही संघटनेतर्फे करण्यात आली.

बैठकीच्या शेवटी बांधकाम क्षेत्राच्या वतीने बीएआय पुणे सेंटरने आरएमसी दरवाढीचा पुनर्विचार करून दरांचे सुसूत्रीकरण करण्याबाबतचे निवेदन सादर केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×