Breking News
१० कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणात रिलस्टारला बेड्याकोंढव्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसायमतदार यादी दुरूस्तीची बतावणी, ५ लाखांचा गंडाकंपनीचा मालक असल्याचे सांगत करीत होता लुटएमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात ११वा विद्यारंभ समारंभ संपन्नफेरीवाल्याकडे हप्ता मागणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हागुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ९६ लाखांची फसवणूकमतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात दुरस्तीची बतावणीविवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पंजाबमधून पळवून आणलेमहाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मतदार यादी दुरूस्तीची बतावणी, ५ लाखांचा गंडा

मतदार यादी दुरूस्तीची बतावणी, ५ लाखांचा गंडा

एपीके फाईल पाठवून ऑनलाईन फसवणूक

marathinews24.com

पुणे – निवडणूक आयोग कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत साबयर चोरट्याने मतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात (एसआयआर फॉर्म) त्रुटी राहिल्याची बतावणी केली. त्यानंतर संबंधिताला एपीके फाईल पाठवून तब्बल ५ लाखांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना २ ऑगस्टला वडगाव बुद्रूकमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कंपनीचा मालक असल्याचे सांगत करीत होता लुट – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वडगाव बुद्रूकमध्ये राहायला असून, २ ऑगस्टला सायबर चोरट्याने त्यांना फोन केला. निवडणूक आयोग कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करीत मतदार नोंदणी यादी दुरूस्ती अर्जात त्रुटी असल्याचे सांगितले. तो अर्ज दुरूस्त करण्यासाठी लिंक पाठवून त्यामध्ये माहिती भरण्यास सांगितले. त्यानंतर एपीके फाईल पाठवून बँक खात्याचा ताबा घेत सायबर चोरट्याने तरूणाची ५ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करीत आहेत.

येरवड्यात भरदिवसा अल्पवयीनचा मोबाइल हिसकावला

रस्त्याने पायी चाललेल्या अल्पवयीनाला थांबवून बोलण्यात गुंतवून चोरट्याने ८ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना १० ऑगस्टला भरदिवसा संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील राजीव गांधी हॉस्पिटलजवळ घडली आहे. याप्रकरणी येरवडा परिसरात राहणार्‍या १६ वर्षीय मुलाने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगा येरवडा परिसरात राहायला असून, १० ऑगस्टला संध्याकाळी चारच्या सुमारास तो राजीव गांधी हॉस्पिटल जवळून पायी जात होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एकाने अल्पवयीनाला थांबवले. त्याला बोलण्यात गुंतवून ८ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. अल्पवयीनाने आरडाओरड करेपर्यंत चोरटा पसार झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×