Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

राज्याच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य

क्वांटम टेक्नॉलॉजी मिशनला शासनाचे पूर्ण सहकार्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

marathinews24.com

पुणे – राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन आणि क्षमतावृद्धीला शासन प्राधान्य देत असून, महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन तसेच फॅकल्टी डेव्हलपमेंटसारख्या उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

‘संवाद वारी’ डिजिटल चित्ररथाला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सदिच्छा भेट – सविस्तर बातमी

आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशन (I-HUB QTF), आयआयएसईआर पुणे यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन – फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत प्रमाणपत्र वितरण व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, आयआयएसईआर पुणेचे संचालक प्रा. सुनील भागवत तसेच राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांतील प्राध्यापक व संशोधक उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असून संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग क्षेत्राला नवी दिशा देण्याची क्षमता त्यात आहे. राज्यात सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शिक्षकांचे कौशल्यवर्धन, संशोधनाला प्रोत्साहन आणि उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक बळकट करणे आवश्यक आहे. या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी शासन निधीची कमतरता भासू देणार नाही. आवश्यकतेनुसार केंद्र शासनाकडूनही सहकार्य मिळवून दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. सुनील भागवत यांनी महाराष्ट्रात क्वांटम तंत्रज्ञानाचा प्रसार, संशोधनाला चालना आणि भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. शासनाच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशनला अधिक बळ मिळेल आणि राज्य तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री पाटील यांच्या हस्ते फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×