Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३९ वाहनांचा जाहीर ई-लिलाव

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३९ वाहनांचा जाहीर ई-लिलाव

३० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आयोजित 

marathinews24.com

पुणे – मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत अटकावून ठेवलेल्या ३९ वाहनांचा जाहीर ई-लिलाव पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.

पुणे लोकमान्य फेस्टिवल २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरला रंगणार – सविस्तर बातमी 

लिलाव करण्यात येणारी वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय, हडपसर बस डेपो, राजंणगाव पोलीस स्टेशन, शेवाळवाडी बस डेपो, आवारात २० ते २६ सप्टेंबर दरम्यान कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे. लिलावाचे अटी व नियम १९ सप्टेंबरपासून कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध असतील. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील.

कोणतेही कारण न देता ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×